सर्वांना
नमस्कार.
पायाभूत
चाचण्या बऱ्याच ठिकाणी घेतल्या गेल्या आहेत. काही ठिकाणी प्रश्नपत्रिका मिळण्यात,
वेळापत्रकात, चाचणी घेण्यात, तपासण्याच्या पद्धतीत काही अडचणी आल्या आहेत असे समजते. त्यातील जास्तीत
जास्त अडचणी आपण पुढील वेळी दुरूस्त करू.
सगळीकडून
एक मत मात्र ऐकायला मिळत आहे आणि ते म्हणजे या चाचण्यांमधील प्रश्न फार चांगले
आहेत. मुलांबद्दल नेमकी माहिती समजते आहे. ज्या मुलांना काहीच येत नाही असे वाटते
त्यांना काय काय येते हे देखील चाचणीतून समजत आहे. आपल्या वर्गाची अडचण नेमकी काय
आहे ते ओळखायला शिक्षकाला मदत होईल अशा प्रकारचे प्रश्न यात आहेत. या प्रश्नांचे
शिक्षकांनी मोठ्या प्रमाणावर स्वागत केले आहे. अशा प्रकारचे प्रश्न असलेले
प्रश्नसंच उपलब्ध करून देण्याची सूचनाही अनेकांनी केली.
पाठ्यपुस्तकांमधील
प्रश्नांचा संदर्भही या प्रश्नसंचांमध्ये दिलेला आहे. ते प्रश्नही करून घ्यावेत.
या प्रश्नसंचातलेच प्रश्न संकलित 1 व
2 ला येतील असे नाही. या प्रकारचे किंवा यापेक्षा निराळे
प्रश्नही येऊ शकतील. परंतु या प्रश्नांचा विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना फायदा
होईल अशी खात्री वाटते. या प्रकारचे प्रश्न मुलांच्या परिसराशी जोडून, मुलांची नावे वापरून विचारावेत.
हे प्रश्नसंच महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे. यांनी तयार केले आहेत.
प्रश्न संच
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा